अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 19 ऑक्टोबर रोजी प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. त्यानंतर सर्व स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी प्लास्टिक मुक्त अभियाना संदर्भात आवाहन केले. तद्नंतर उपस्थित सर्वांनी प्लास्टिक मुक्तीची शपथ घेतली.
याप्रसंगी माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी स्वयंसेवकांची वेगवेगळ्या गटात विभागणी करुन त्यांना महाविद्यालय परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे नियोजन केले. महाविद्यालय परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यानंतर सर्व स्वयंसेवकांना अल्पोपहार देण्यात आला. श्रमदानाची सांगता रासेयो महीला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी केली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.