विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन…
अमळनेर:- आज जग झपाट्याने बदलत असून त्याबरोबर जे बदलणार नाहीत ते मागे पडतील,या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षा क्लासेसचे मार्गदर्शन घेणे काळजी गरज आहे. विविध क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी मराठा सेवा संघ, अमळनेर तर्फे नीट, जेईई, सीइटी या परीक्षांसाठी भव्य मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
२२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० ते १२:०० वाजेदरम्यान मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लातूर पॅटर्नचे सुप्रसिद्ध शिक्षक प्रा.श्री जितेंद्र ना. चव्हाण सर तर श्री राकेश जाधव साहेब ( डी.वाय.एस.पी, अमळनेर) डॉ.श्री.राहुल बाविस्कर (सुप्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ, नाशिक) शिवश्री.जयवंतराव पाटील (अध्यक्ष, मराठा समाज, अमळनेर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिबिरास विद्यार्थी व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.