मोफत आरोग्य तपासणी उपचार व रक्तदान शिबीराचे आयोजन…
मुंगसे ता.अमळनेर:- येथून जवळच असलेल्या निमगव्हाण येथील तापी नदीकाठावरील धुनिवाले बाबा मंदीरांत स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परमहंस यांची ४१ वी पुण्यतिथी सोहळा सालाबादाप्रमाणे धनत्रयोदशी शनिवारी दि . २२ ऑक्टोंबर २०२२ रोजी श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
सकाळी १० वाजेपासून मोफत आरोग्य तपासणी, उपचार व रक्तदान शिबिर सुरु होणार आहे. तरी या स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परमहंस १००८ पुण्यतिथीनिमित आयोजन केले आहे. भक्तगणाच्या स्वागतासाठी निमगव्हाण ग्रामस्थ सज्ज झाले असून या कार्यंक्रमास गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या तिन्ही राज्यातून हजारो महिला पुरूष, बालगोपाल भाविक हजेरी लावत असतात. कार्यक्रमाचे वेळापत्रक सकाळी ६ ते ७ समाधी अभिषेक, ८ ते १२ निशाण व पालखीची मिरवणुक, दुपारी १२ ते १ महाआरती व तिर्थप्रसाद, १ ते ५ महाप्रसाद, रात्री ८ते ९ आरती व नामस्मरण, ९ ते १o मशाली व निशाण प्रदक्षिणा, रात्री १० ते १२ वाजेपर्यंत भजनसंध्या कार्यक्रम अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे अध्यक्ष व विश्वस्थ मंडळ स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परमहंस दादाजी धनिवाले प्रतिष्ठान निमगव्हाण तर्फ प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.