आम आदमी पार्टीची मागणी, उपोषणाचा दिला इशारा…
अमळनेर:- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे पीक नव्हे तर संसार वाहून गेला असताना त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही, कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असताना कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी व प्रशासन पंचनामा करायला येत नाहीत. फोटो काढून पाठवा असे सांगतात. प्रत्यक्ष पंचनामे झाल्यावर सत्य परिस्थिती दिसते म्हणून प्रत्यक्ष पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. तुषार निकम व वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील, प्रा. गणेश पवार, नाना पाटील, राजेंद्र पाटील, भागवत बाविस्कर, स्वप्नील पाटील, नंदु पाटील, रामकृष्ण देवरे, महेंद्र साळुंके, सलीम वायरमन, मुकेश राजपूत, संजीव पाटील, उमाकांत ठाकूर, शहर व तालुका पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री, प्रांत, तहसीलदार, कृषी अधिकारी व सर्व संबंधित लोकांना निवेदन देत मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळावा म्हणून आग्रह धारणाऱ्या आम आदमी पार्टीचे वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे धनंजय सोनार यांनी सांगितले आहे.