दहिवद ग्रामपंचायतीचा उपक्रम, 140 महिलांची टीम करणार देखभाल…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत गुरुवारी 7 हजार झाडे लावण्याच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिला, ग्रामस्थ तसेच पदाधिकारी मिळून 7 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहेत.
सरपंच देवानंद बहारे यांनी महात्मा गांधी रोजगार योजनेतून बिहार पॅटर्न राबवण्यासाठी 140 महिलांची टीम बनवून गावात 7 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट हाती घेतले असून हजारो झाडे लावण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच देवानंद बहारे यांनी केले. अध्यक्षस्थानी छत्तीसगडचे उद्योगपती व दहिवद गावाचे भूमिपुत्र दिनेश पाटील (सदस्य भारतीय कृषि अनुसंधान परिषद,कृषि कल्याण मंत्रालय नवी दिल्ली) होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक प्रवीण काशिनाथ माळी (माजी उपसरपंच दहिवद)प्रमुख मान्यवर म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य मिनाबाई रमेश पाटील, जयवंत गुलाबराव पाटील (चेअरमन नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद), ईश्वर गिरधर माळी (चेअरमन दहिवद विविध कार्यकारी सोसायटी), अनिल भटा माळी (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद मराठी शाळा), राजेंद्र देसले (सामाजिक कार्यकर्ते), शिवाजी काशिनाथ माळी (माळी समाज पंच मंडळ उपाध्यक्ष), ग्रामपंचायत सदस्य माणिकराव पाटील, हिराबाई धुडकर, आशाबाई माळी, वर्षा पाटील, योगिता गोसावी, मालुबाई माळी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सोनवणे, तांत्रिक अधिकारी धिरज पाटील,ग्रामरोजगार सेवक भागवत सोनवणे,दहिवद विकास मंचचे गोकुळ माळी, गुलाब पाटील, गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, गावातील आजी माजी पदाधिकारी, नवभारत माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी ,आश्रमशाळा मुख्याध्यापक कर्मचारी, जिल्हा परिषद मराठी शाळा मुख्याध्यापक, कर्मचारी, उपकेंद्र दहिवद कर्मचारी, विद्युत वितरण कर्मचारी, तलाठी ,मंडळ अधिकारी, कर्मचारी, पीक संरक्षक सोसायटी पदाधिकारी हजर होते. उदघाटन मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने करण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व दहिवद गावाच्या गावकरी बंधू आणि भगिनींचे मनापासून आभार मानून व आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन शिवाजी पारधी (ग्रामपंचायत सदस्य) यांनी केले व आभार माजी उपसरपंच अनिल माळी यांनी मानले.