पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेत आयोजन…
पातोंडा ता.अमळनेर:- दि. 15 नोव्हेंबर 1967 माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेची स्थापना करण्यात आली होती. त्याचे औचित्य साधत मुख्याध्यापक संघटनेच्या सुचनेनुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षात दि. 15 नोव्हेंबर हा दिवस शिक्षकेतर कर्मचारी दिन म्हणून साजरा करण्याचे सुचीत करण्यात आले.
त्यानुसार येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेत शिक्षकेतर कर्मचा-यांचा सन्मान करत पहिला शिक्षकेतर दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे ग्रंथपाल प्रमोद साळुंखे, लिपीक राहुल पवार, राजन बिरारी, नाईक राजेंद्र संदानशिव, शिपाई किशोर पाटील, अनिल बिरारी, अतुल पवार व प्रयोगशाळा सहाय्यक चेतन पवार यांचा शिक्षकांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक प्रदिप शिंगाणे, जेष्ठ शिक्षक शिक्षक शरद सोनवणे व प्रदिप लोहारे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतूक करत शाळेचे सेवानिवृत्त लिपीक स्व. डिगंबर पाटील, लक्ष्मण पवार व शिक्षकेतर कर्मचारी स्व.शांताराम शिंपी, स्व. रघूनाथ महाले, स्व. प्रल्हाद पाटील, स्व एकनाथ पाटील, स्व अशोक पवार, शेषराज लाड, नामदेव संदानशिव व विजय झंझणे यांच्या आठवणींना उजाळा दिला. पहिला शिक्षकेतर दिन साजरा करत शिक्षकेतर कर्मचा-यांचा सन्मान केल्याबद्दल ग्रंथपाल प्रमोद साळुंखे यांनी मुख्याध्यापक संघटना व शिक्षकांचे आभार मानले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक व्हि सी पाटील, शिक्षक डि के पाटील, बी के मोरे, महेंद्र पाटील, ललित पवार, पंकज धनगर, अमित पवार, भुषण बिरारी, छाया संदानशिव, सुनंदा पारधी व विद्यार्थी उपस्थित होते.