अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील ३८ वर्षीय इसम तीन दिवसापासून कामावर जातो सांगून घरी न परतल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार मारवड पोलीसात देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शांताराम बापू पवार (वय ३८) हा दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कामावर जावून येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र आज पावतो घरी न परतल्याने यशोदा पवार यांच्या तक्रारीवरून मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. सुनील तेली हे करीत आहेत.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024