अमळनेर:- तालुक्यातील लोण तांडा शिवारात गावठी दारू विकणाऱ्या एकावर मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स.पो.नि. जयेश खलाने यांना माहिती मिळाली की, लोण ते भरवस रस्त्यावर लोण तांडा गावाच्या अलीकडे गाड रस्त्यावर बापू बारकु वडर हा गावठी दारू विक्री करत आहे. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी पळून गेला व त्याठिकाणी १२०० रुपये किमतीची १५ लिटर दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. त्यावरून मारवड पोलीसात आरोपीविरुद्ध दारूबंदी कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024