अमळनेर:- येथील साने गुरुजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारती विद्यापीठाच्या परीक्षेत यश मिळवले असून एकूण ९५% निकाल लागला आहे.
भारती विद्यापीठ, पुणे संचलित सप्टेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी परीक्षेत प्रतीक विनोद शिंदे (ई. ७वी) याने १०० पैकी १०० गुण मिळवून तो राज्यात प्रथम आला आहे. आयुष दीपक सोनवणे याने ९९ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच पार्थ दिलीप पाटील याने ९७ गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना किशोर अहिरराव सरांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक गुलाबराव पाटील, अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजीव सोनवणे तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.