परिसरातील ग्रामस्थ व बँक कर्मचाऱ्यांनी केला सन्मान…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड सेंट्रल बँकेतील कर्मचारी भगवान अहिरे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल परिसरातील ग्रामस्थ व बँक कर्मचाऱ्यांनी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
मारवड येथील सेंट्रल बँकेत भगवान अहिरे हे गेल्या ३५ वर्षापासून शिपाई म्हणून सेवा देत होते. बँकेत आलेल्या ग्राहकाला सन्मानाने वागणूक देत असल्याने तसेच आदरपूर्वक वागत असल्याने परिसरातील अनेकांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते. दिनांक ३० नोव्हेंबर रोजी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जि.प. सदस्य शांताराम शामराव पाटील, महेश उत्तमराव पाटील, साहेबराव चिंधा पाटील, हरिभाऊ मारवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मारवड हायस्कूलचे मुख्याध्यापक एल जे चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “भगवान दादा यांनी ग्राहकांना आदराची वागणूक दिली. परराज्यातील ब्रांच मॅनेजर व ग्राहक यांच्यातील दुवा भगवान दादा होते. अनेकांचे वाद होत असेल तरी त्यात समोपाचाराची भूमिका ते निभावत होते.” शांताराम पाटील म्हणाले की, मारवड येथे बँक सुरू झाल्यापासून भगवान दादा यांनी ग्राहकांना उत्तम सेवा दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी भगवान अहिरे यांचा सपत्नीक सत्कार अमळनेर येथील शाखा व्यवस्थापक यांनी केला. तसेच कर्मचाऱ्यांनी ही भगवान अहिरे यांचे ऋण व्यक्त केले. यावेळी अमळनेर शाखेतील रमनलाल कावडे, सुनील सोंहिया, आर. डी. जोशी यांच्या सह अन्य कर्मचारी उपस्थित होते.