
एसटी नेली पोलीस ठाण्यात, गुन्हा दाखल…
अमळनेर:- अमळनेर तांदळी एसटीत मद्यपीने राडा घातला महिला वाहकाशी वाद घातल्याने एस टी पोलीस ठाण्यात नेत एकाविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहक शीतल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काल १७ डिसेंबर रोजी नियमित ड्युटीनुसार चालकासह अमळनेरहून तांदळी येथे पोहचलो त्यानंतर तांदळी येथून परत येताना निम येथे काही प्रवासी बसले. त्यावेळी तिकीट तपासले असता ३४ तिकीट निघाले होते मात्र बसमध्ये ३५ प्रवासी असल्याने तपासले असता एक इसम मागील सीटवर झोपलेला आढळून आला. त्यास तिकीट घेतल्याचे विचारले असता तिकीट देणे तुमचे काम आहे असे उलट बोलू लागला. त्यानतंर महिला वाहकाने त्यास कळमसरे गावाच्या पुढे निम ते अमळनेर तिकीट काढून दिले असता सदर इसमाने दारूच्या नशेत तू माणूस असता तर तुला दाखवले असते, मी तुझी नोकरी खावून जाईल असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. त्यानतंर इतर प्रवाश्यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता तो जुमानत नसल्याने एसटी पोलीस ठाण्यात नेली. त्याठिकाणी पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव भगवान राजेंद्र पाटील रा. निम ह.मु. सुरत असे सांगितले. सदर फिर्यादीवरून इसमाविरुद्ध मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहेत.







