
अमळनेर:- तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता कोणताही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही.

तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीपैकी ४ बिनविरोध झाल्याने २० ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. एकूण २७१४७ मतदारांपैकी २१६२६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदान टक्केवारी ८१.१५, महिला मतदान टक्केवारी ७८.०७ असे एकूण सरासरी मतदान ७९.६६ टक्के झाले. उद्या जय पराजयाच्या कौलाची उत्सुकता आता ग्रामस्थांना लागली आहे.







