६ ते १० जानेवारी दरम्यान आयोजन, विविध कार्यक्रमाची रेलचेल…
अमळनेर:- येथील लायन्स क्लब अमळनेर आयोजित लायन्स एक्स्पोचे भूमिपूजन संत सखराम महाराज संस्थान चे गादीपुरुष प.पू.प्रसाद महाराजांच्या हस्ते मंगळवार (ता.२०) रोजी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडले.
६ ते १० जानेवारी दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरील जागेवर लायन्स क्लब अमळनेर तर्फे भव्य अशा लायन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या जागेचे भूमिपूजन करण्यात आले असून शहर व तालुक्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या स्टॉलचे आयोजन करण्यात येणार आहे.यात मनोरंजन,ऑटो झोन, बिझिनेस झोन,फूड झोन,किड्स झोन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. भूमिपूजन प्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रकाश मुंदडा, सरजू गोकलानी, बजरंग अग्रवाल, लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनी, प्रोजेक्ट चेअरमन नीरज अग्रवाल, डॉ.किशोर शहा,प्रदीप जैन,पंकज मुंदडे, प्रशांत सिंघवी,जितेंद्र जैन, प्रकाश शहा, उदय शहा, महेंद्र पाटील, मनीष जोशी, हितेश शहा, जितू कटारिया, येझदी भरुचा, अभिनय मुंदडा,नितीन विंचूरकर, प्रताप पारख,प्रीतम मणियार, लालू सोनी,प्रसन्ना पारख, दिलीप गांधी,मुरली बितराई, धीरज अग्रवाल, डॉ.देशमाने, रुपेश मकवाना, आदित्य कोठावदे,मुकुंद विसपुते, महेंद्र पाटील,तसेच लिओ चे शुभम मुंदडा, गौतम मुंदडा, मिहीर पवार, कुशल गोलेच्छा, पत्रकार किरण पाटील, व्यावसायिक सतीश पाटील, अनिल जोशी, उदय देशपांडे तसेच लायन्स व लिओ चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या एक्स्पो मध्ये प्रत्येक झोन स्वतंत्र राहणार असून ६ ते १० जानेवारी दरम्यान चार दिवस दुपारी चार ते रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहे.फूड झोनमध्ये विविध खाद्यपदार्थ तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम असणार आहेत.एक्स्पो ची जोरदार तयारी सुरू असून लायन्सचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत.