विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देत घातले साकडे…
अमळनेर:- अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांचे निवेदन मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओमजी बिर्ला यांना त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन दिले.
निवेदनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम पूर्ण वेळ मोजून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते लागू करावेत.किंवा किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन लागू करावे.मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी लागू करण्यात यावी.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाचे आणि जास्त क्षमतेचे नवीन मोबाईल तात्काळ पुरवावेत. पोषण ट्रकरची भाषा प्रादेशिक (मातृभाषा) करण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करण्यात यावी.मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्यात यावे.या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचा समावेश आहे. यावर ओमजी बिर्ला यांनी सविस्तर चर्चा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वरील मागण्या सोडविण्यासाठी लोकसभेत चर्चा करण्याची सुचना करण्यात येईल तसेच सकारात्मक विचार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात श्रीमती मायाताई परमेश्वर, (महाराष्ट्र), साजिदा खान (राजस्थान), चंदा यादव (उत्तर प्रदेश), पार्वती आर्य (मध्य प्रदेश), श्री.सैय्यद (गुजरात), यांच्यासह रामकृष्ण बी.पाटील, वनिता देशमुख, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे यांची उपस्थिती होती असे संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.