विविध पदांवर निवड झालेल्या तरुणांचा सत्कार समारंभ संपन्न…
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथील एकाग्रता करिअर डेव्हलपमेंट पॉईंट शिरसाळे तर्फे आयोजित विविध पदांवर निवड झालेल्या तरुणांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपस्थित मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय जयेश खलाणे यांनी मनोगत व्यक्त करताना “येथील तरुणांचा स्पर्धा परीक्षांमध्ये असलेला उत्साह पाहून व ग्रामस्थांनी सुरू केलेली स्पर्धा परीक्षा चळवळ पाहून मी पूर्णपणे भारावलो असे उदगार काढले. पुढे ते म्हणाले की, प्रत्येक गावात अशी स्पर्धा परीक्षा चळवळ उभी राहिली पाहिजे याबाबतीत शिरसाळे येथील स्पर्धा परीक्षा चळवळ एक आदर्श चळवळ आहे येथील तरुणांनी जास्तीत जास्त मेहनत करून अजून उच्च पदांवर भरारी घ्यावी सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास उत्तुंग शिखरे गाठता येतात. ग्रामीण भागातील मुलींचाही स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढला पाहिजे असे मत खलाने यांनी व्यक्त केले. सरपंच युवराज पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी देवेंद्र पाटील एसटी वाहक भरत पाटील निवृत्त जवान महेश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात स्कुल कमिटी चेअरमन व निवृत्त विस्तार अधिकारी रामलाल वंजी पाटील यांनी अभ्यासिकेसाठी सर्वोतोपरी ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत व यापुढेही करतील असे आश्वासन दिले. कार्यक्रमात निवृत्त जवान विकास रुपचंद महाले यांची पोलीस पदी, निखिल सुनिल महाले याची इंडियन नेव्हीत, मयूर नगराज महाले याची इंडियन आर्मीत, मयूर भटू पाटील यांची इंडियन नेव्हीत, हृतिकेश विलास पाटील यांची इंडियन आर्मीत निवड झाल्याबद्दल तर दिनेश शांताराम बारेला नॅशनल गेम्स कबड्डी गोल्ड व गौरव नगराज महाले यांनी नॅशनल गेम्समध्ये रनिंग गोल्ड मेडल तर दिनेश चौधरी याचा सामान्यज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील,अशोक पाटील, पोलीस पाटील रामचंद्र चौधरी, पोलीस पाटील प्रदीप चव्हाण पूज्य सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गोरख पाटील, निवृत्त लिपिक लक्ष्मण चौधरी माजी सरपंच सुदाम चौधरी विकासो चेअरमन दिनेश पाटील, व्हाईस चेअरमन भरत चौधरी, युवराज चौधरी, रोहिदास पाटील , युवराज महाले ,लक्ष्मण कोळी, बाबूलाल पवार ,श्याम जाधव, निवृत्त जवान महेश पाटील, धुळे ग स बॅंकेचे शाखाधिकारी गिरीश पाटील , निंभोरा हायस्कूलचे उपशिक्षक किरण पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. नारायण पितांबर पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारवड पोलीस स्टेशनचे हवालदार उज्ज्वल पाटील व एकाग्रता करीअर डेव्हलपमेंट पॉईंटच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन विजयसिंग पवार यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमास गावातील महिलांसह पुरुष व परिसरातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.