५० वर्षांनी एकत्र जमले वर्गमित्र, जागविल्या जुन्या आठवणी…
राकेश पाटील
पातोंडा ता.अमळनेर:- येथील श्री.दत्त विद्या मंदिर शाळेचा १९६५ ते १९८० या बॅच चा विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जमलेल्या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनसोक्त गप्पा मारल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माजी मुख्याध्यापक डी.आर. जगताप होते.या प्रसंगी सेवानिवृत्त गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.दरम्यान मेळाव्यास उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शाळेतील आठवणींना उजाळा देत स्नेह मेळावा उत्साहात पार पाडला. मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे,हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता’. कोणत्याही शाळेसाठी त्यांचे यशस्वी विद्यार्थी म्हणजे मोठी उपलब्धीच.आज हल्ली सेवानिवृत्त असलेल्या तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, भविष्यात पुन्हा सर्वांनी एकत्र यावे,असा मानस व्यक्त करून सर्वांनी आपला परिचय करून दिला.मनसोक्त गप्पा मारल्या. शालेय जीवनात प्रत्येक शिक्षकाकडून होणारे ज्ञानार्जन आणि शिक्षा या आठवणींबरोबरच अनेकांनी शाळेतील आठवणींचा मार्ग मोकळा करून दिला.एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविषयी माहिती दिली. सध्या कोण काय नोकरी, व्यवसाय करतोय, याबाबत सांगितले.यावेळी गुरुजनांचा व वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. सन्मानाच्या उत्तरादाखल भाषण करताना झंझने सर,अरुण देशमुख, अशोक पवार, साहेबराव बिरारी, चंद्रकांत महाले यांनी उच्च स्मरणशक्ती, वकृत्व आणि समयोचीत संदेश देताना त्यांच्या शाळेतील प्रदीर्घ कालावधीच्या आठवणी दाटून आल्या.यावेळी कवी प्रभाकर शेळके,कवी मगन सुर्यवंशी व कवी वालजी सर बिरारी यांच्या कविता झाल्यात.वालजी सर बिरारी यांची “यंदा नी निवडणूक ले उभा राहिज्याना व्ह्युई जा ना पुढारी” या कवितेने उपस्थितांची दाद मिळविली.गावातील विविध सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक,शैक्षणिक कार्याची यावेळी दखल घेतली गेली व सर्वांनी योगदान देत राहू असे सांगीतले.यावेळी वरणभात,पुरी,मठाची भाजी व जिलेबी या स्नेहभोजनचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पातोंडा परिसर विकास मंचच्या कार्यकर्त्यांसह श्री.दत्त मंदिर शाळेचा शिक्षक व कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले. प्रा.मगन सूर्यवंशी, अशोक मांडे व वसंत भदाने यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी शाळेचे माजी शिक्षक भास्कर भावसार,सुरेश बागुल, प्रल्हाद बिरारी,मुरलीधर कुडे, इत्यादि सह माजी विद्यार्थी सुधाकर जगताप,नामदेव मोरे, ईश्वर लोहार,मंगा मोरे, प्रभाकर जगताप, अंबादास ईसे,चंद्रकांत ईसे, जिजाबराव बोरसे, अनिल सोनार, रोहिदास कापडे,रमेश बोरसे, देविदास महाले,पांडुरंग ईसे, हमिदखा पठाण,हिमंत बोरसे, कौतिक चौधरी,जिवनराम पवार, मधुकर पवार,श्रीराम पवार, एम.आर.देवरे,प्रभाकर बावीस्कर, आत्माराम देसले, श्रीराम पाटील,ज्ञानेश्वर बिरारी, प्रवीण बिरारी,काशिनाथ सूर्यवंशी, रामकृष्ण महाले,सरपंच भरत बिरारी, विकासो चेअरमन सुनील पवार,शाळेचे अध्यक्ष माजी जि.प.सदस्य विनायकदादा बिरारी,संचालक संदीप पवार, विकासो संचालक किशोर मोरे, ग्रा.पं.सदस्य सोपान लोहार,पीक संरक्षक सो.सा.चेअरमन अशोक पवार व विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया….
सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून आपल्या शालेय जीवनातील आठवणी सोबत एकमेकांशी हितगुज करणे हा उद्देश होता, जेणेकरून सर्वांना एकत्रितपणे वेळ घालवीता येईल.एकमेकांची झालेली प्रगती आणि विविध क्षेत्रात कार्यरत विद्यार्थी यांचा यशस्वी जीवनाचा आलेख सर्वांसमोर मांडणे हा हेतू साध्य झाला.शाळेशी जुळलेली नाळ आणि गुरुजनांचा आठवणी यांचा सुरेख संगम साधून गुरुजनं व विद्यार्थी एकत्र जगायला मिळालं. ह्यासाठी सर्वांशी संपर्क करून आम्ही सर्वांना एकत्र आणू शकलो.हा एक सुखद असा क्षण आमच्यासाठी आठवणीत राहील.
:- प्रा.मगन सूर्यवंशी (माजी विद्यार्थी) ह.मू.डोंबिवली