छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रंगले संमेलन…
अमळनेर:- “भ्रष्टाचार मिटाने के लिये अण्णा ने बडा आंदोलन किया, भ्रष्टाचार वही के वही है, लेकिन आण्णा कही नही है” असे मार्मिक चिमटे काढत अकोल्याचे कवी घनश्याम अग्रवाल यांनी श्रोत्यांची मनात हात घालून सभागृहात हास्यकल्लोळ माजवला. पत्रकार दिनानिमित्त अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हास्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाचे उदघाटन आमदार अनिल पाटील व माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यात हिंदी, मराठी उर्दूसह अहिराणीपर्यंतची गझल. चुकीच्या व्यवस्थेतवर प्रहार, त्यातून निर्माण होणारे विडंबनाने हस्स्याने अमळनेरकर लोटपोट होत तब्बल सव्वातीन तास हसत राहिले. निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी अहिराणी गाणे आणि कवितांमधून टाळ्या मिळवल्या. दूरदर्शन कलाकार विलासकुमार शिरसाठ यांनी मिमिक्रीतून श्रोत्यांची दाद मिळवली. मालेगावचे दिव्यांग कवी सागर इब्राहिम यांनी गोधडी आणि झंडू बाम कविता सादर करून वाहवाह मिळवली. कलीम गडबड व मुजावर मालेगावी यांनी कोरोना काळातील साहित्यिक व शायर यांचे झालेले हाल आणि विनोद आपल्या कवितेतून सादर केले. सुंदर मालेगावी यांनी स्वतःवर विडंबन करताना म्हटले की ‘ लोग कहते है गंजा हू ,काला हू मै, मा तो कहती है घरका उजाला हू मै ‘ झीनत कुरेशी यांनी विनोदी कविता सह शेरोशायरी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले. हास्यकाव्य संमेलनाचे आयोजन जितेंद्र ठाकूर यांनी केले. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, धुळे लाचलूचपत विभाग पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, धुळे समाज कल्याण अधिकारी मनिष पवार, जळगांव पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, तहसीलदार मिलिंद वाघ मुख्यधिकारी प्रशांत सरोदे, रत्नदीप सिसोदिया, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, खान्देश शिक्षण मंडळ चेअरमन हरी वाणी , अशोक पाटील, माजी जिप सदस्य जयश्री पाटील, जयवंतराव पाटील, गोकुळ बोरसे, डॉ अविनाश जोशी, डॉ प्रकाश ताडे, डॉ भूषण पाटील,डॉ अनिल शिंदे, धुळे जिप माजी सदस्य के डी पाटील आदी उपस्थित होते.
निवृत्त तहसीलदार सुदाम महाजनही या काव्य संमेलनात सहभागी झाले आणि त्यांनी सुरुवातीपासूनच आपल्या खुमसदार शैलीने अहिराणीतील काव्य, विडंबन सादर करून सभागृहातून टाळ्या मिळवल्या. तस शेवटीही सातबारा ही कविता सादर करून दाद मिळवली. महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी महाराष्ट्र पत्रकार संघाचा उत्कृष्ट वेब पोर्टल संपादक पुरस्काराने खबरीलालचे संपादक जितेंद्र ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर, राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब राशिनकर आणि राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर आर. महाजन, संजय सुर्यवंशी मा.तालुकाध्यक्ष,निरंजन पेंढारे, जिल्हा संघटक महाराष्ट्र पत्रकार संघ यांनी हा गौरव केला.