अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवशीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराची सांगता रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी झाली.
या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ अहीराणी साहित्यिक कृष्णा पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागिय समन्वयक डॉ. संजय शिंघाणे हे होते. यावेळी व्यासपीठावर ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील, संस्थेचे सचिव देविदास बारकू पाटील, तर सर्व संचालक मंडळ सदस्य साहेबराव नारायण पाटील, महारु रामदास शिसोदे, सुरेश भिमराव शिंदे, चंद्रकांत रामराम शिसोदे, विश्वास विनायक पाटील, लोटन शिवदास पाटील, राजेंद्र फकीरा पाटील, दिनेश वासुदेव साळुंखे, मनोज हिम्मतराव पाटील तसेच गावातील विविध मान्यवर उपस्थित होते. समारंभाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. यात त्यांनी गेल्या सात दिवसात स्वयंसेवकांनी गावात केलेल्या विविध कामांची व राबविलेल्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देसले यांनी आपल्या भाषणात ग्रामीण विकासात महाविद्यालय मोलाची भूमिका पार पाडत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांनी एनएसएसमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व व्यक्तीमत्व विकासात वाढ होते, असे प्रतिपादन केले. तर रासेयो विभागीय समन्वयक प्रा. डॉ. संजय शिंघाणे यांनी आपल्या भाषणातून, स्वयंसेवकांना विद्यापीठाच्या विविध व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिबिरे आणि उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन सुदृढ राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी होण्याची आवाहन केले. याप्रसंगी शिबिरार्थीं स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यात मुकेश बैसाणे, कु. प्राजक्ता निकम, कु. किरण साळुंखे, प्रताप भिल, कु. वैष्णवी महाजन यांनी सात दिवसात रासेयो स्वयंसेवकांनी गावात राबविलेले विविध उपक्रम, सुधारणा कामे, स्वच्छता जनजागृती, शासनाच्या विविध योजना व बौद्धिक क्षेत्रातील व्याख्यान्यांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी शिबिरार्थींनी “युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास” हे पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात देविदास शामराव पाटील यांनी स्वयंसेवकांना विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवुन आपला व्यक्तीमत्व विकास साध्य करावा, आणि सुजाण नागरिक बनून आपल्या गावाचे व महाविद्यालयाचे नाव मोठे करावे असे आवाहन केले. याप्रसंगी मधुकर कौतिक पाटील, मुख्याध्यापक गजमल भगा शिंदे, बापूसाहेब साळुंखे, महेंद्र पाटील, नरेंद्र शांताराम पाटील, रावसाहेब मांगो पाटील शिक्षण विस्तार अधिकारी, अनिल निंबा पाटील, योगेश गुलाब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन – प्रा डॉ. सतिश पारधी व कु. नाजमीन पठाण यांनी केले. आभार प्रदर्शन स्वयंसेवक आकाश पाटोळे याने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयो महीला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी बांधवांनी परिश्रम घेतले.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024