
सचिन खंडारे मित्र परिवार व सुदर्शन मित्र मंडळातर्फे आयोजन…
अमळनेर:- शहरातील मध्यवर्ती भागात २४ ते ३० जानेवारी दरम्यान ॲक्युप्रेशर, सुजोक थेरपी शिबीराचे आयोजन सचिन खंडारे मित्र परिवार व सुदर्शन मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.
रिसर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्था हनुमानगढ, राजस्थान येथील ॲक्युप्रेशर थेरेपीस्ट थेरेपीस्ट महेंद्र पिताणी, थेरेपीस्ट एम. आर. डॅऊकिया व त्यांचे सहकारी यांच्या द्वारे उपचाराची सेवा देण्यात येईल. ॲक्युप्रेशर ही एक नैसर्गिक उपचार पध्दती आहे. ॲक्युप्रेशर पॉइंट हाताच्या व पायाच्या तळव्यावर असतात. जेव्हा आपल्या कोणत्याही अवयवाला आजारपण येते तेव्हा हे पॉईंट बिघडलेले असतात. या पॉइंटला ॲक्युप्रेशर, सुजोक थेरपी या उपचाराच्या पध्दतीने प्रकृती हळूहळू सुधारून आजार बिना औषधाने बरा होतो. तसेच रक्तप्रवाह सुरळीत होवून रोगप्रतिकार शक्ती वाढते व रुग्णास बरे वाटू लागते. सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांचे नैसर्गिक पध्दतीने उपचार होणार आहे. मणक्याचा आजार, सांधेदुखी, पाठीचा त्रास, डोकेदुखी, हातापायाला मुंग्या, थायरॉईड, मानदुखी, कंबरदुखी, अतीसार, पोटाचे विकार, ब्लड प्रेशर, चिकन गुनिया, लठ्ठपणा, झोपेत लघवी होणे, मधुमेह, ॲलर्जी, दमा, पॅरालिसीस, झोप न लागणे, गॅस, अपचन, पोटरीमधील नस आखडणे, नाक, कान, घसा यांचे आजार यावर उपचार केले जातील. शिबिर मंगळवार, दि. २४ जानेवारी ते सोमवार, दि. ३० जानेवारी रोजी दररोज सकाळी ८ ते दु. १२ वा. दुपारी ४ ते रात्री ८ वा. पर्यंत श्री गजानन महाराज मंदिर, दुर्गा हॉस्पिटल समोर, बस स्टॅण्डच्यामागे असणार आहे. सदर शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




