
एकास अटक, मारवड पोलिसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथे मारवड पोलिसांनी छापा टाकत सट्टा मटका घेणाऱ्या एकास रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि जयेश खलाने यांनी मिळालेल्या माहितीनुसार हे. कॉ. सचिन निकम, स. फौ. किशोर पाटील, हे. कॉ. फिरोज बागवान, पो.ना. सुनील तेली यांच्या पथकाने छापा टाकला असता कृष्णा दगा भील रा. धानोरा हा लोकांकडून सट्टा लावण्यासाठी पैसे घेताना व जुगाराच्या साहित्यासह मिळून आल्याने त्यास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून मुं.जू.ॲक्ट १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स. फौ. किशोर पाटील हे करीत आहेत.







