
राजे छत्रपती नगर फलकाचे अनावर करून परिसराचे केले नामकरण…
अमळनेर:- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजे छत्रपती गार्डन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा गार्डन चा परिसर हा भगवामय झाला होता.
शहरातील राजे छत्रपती गार्डन याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन प्रतिमा पुजन करण्यात आले. तसेच या परिसराला राजे छत्रपती नगर फलकाचे अनावर करून नवीन परिसराचे नामकरण करण्यात आले. प्रतिमा पुजन व माल्यार्पण हे राजे छत्रपती नगरचे जेष्ठ नागरिक रमेश काटे,चिंतामण पाटील, यशवंत खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले,तर फलकाचे अनावरण दरबार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
परिसरातील महिला भगिनी सुद्धा या वेळी जिजाऊ मॉ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन केले या वेळी महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी महाराजांच्या शौर्य व इतिहास हा पोवाड्याच्या माध्यमातून ऐकवण्यात आला. त्यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते. यावेळी सुनील पाटील, नेताजी पाटील, हेमंत अहिरराव, प्रवीण पाटील, विकास पाटील, विकास चौधरी,प्रशांत चौधरी, अजय पाटील, दिपक काटे, सुनील पाटील, सत्यम पाटील, संदीप पाटील, राजेंद्र पवार, सचिन महाले, सौरभ बोरसे, मोहित पाटील, सचिन पाटील, किशोर निकुंभ, रमेश सूर्यवंशी, आर के पाटील यांच्या सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.




