उपस्थित मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक…
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे बु येथील जिल्हा परिषद शाळेतर्फे बालरंग २०२३ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून जि. प. सदस्या जयश्री अनिल पाटील, मा.सभापती श्याम अहिरे, ग.शि. विश्वासराव पाटील, सरपंच ललिता पाटील,उपसरपंच दिनेश पाटील, बाळासाहेब आधार पाटील, प्रवीण गंगाराम पाटील, जयश्री पाटील, केंद्रप्रमुख विश्वास पाटील, ग्रामसेवक श्रीमती देसले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सौ.जयश्री पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागात असा कार्यक्रम होणे म्हणजे उल्लेखनीय आहे. शाळेवर आपण टाकलेला विश्वास शिक्षकांनी सार्थ केला,असे मला वाटते. पालकांनी सुद्धा मुलांसाठी वेळ दिला पाहिजे.मुलांना गीता सोप्या भाषेत सांगण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. विश्वास पाटील यांनी या शाळेत सेमी इंग्रजी सुरू असून बालाउपक्रमाअंतर्गत शाळेला निधी जमा करून निकष पूर्ण करावेत. जेणेकरून शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण होऊ शकतील. यावेळी गावातील दानशूर लोकांनी १४८०० रुपये व छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीने ५००० रुपये दिले. शाळेतील सर्व बालकांनी अतिशय दर्जेदार कलागुण साजरे केले. प्रास्ताविक विजय पाटील तर सूत्रसंचलन तनया जाधव तसेच ज्ञानेश्वर शिंपी व दिपाली पवार यांनी वेशभूषा सांभाळली. यावेळी गावातील विविध पदाधिकारी, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.