अमळनेर:- राज्यस्तरीय वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवत पारितोषिक पटकावले आहेत.
चाळीसगाव येथील कोतकर कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 20 फेब्रुवारी रोजी डॉ.एम.बी. पाटील राज्यस्तरीय वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रश्नमंजुषा स्पर्धा- 2023 आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेमधील तीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात प्रताप महाविद्यालयाला दुसऱ्या क्रमांकाचे सांघिक पारितोषिक मिळाले. तसेच कु.हेमांगी गिरीश धर्माधिकारी या विद्यार्थिनीला “बेस्ट परफॉर्मर पार्टीसिफंट” हे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेमध्ये गुंजन मोहन जैन, हेमांगी गिरीश धर्माधिकारी, गौरव संजय पाटील यांनी यश मिळवले. सदर स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे प्रमुख तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकांनी मार्गदर्शन केले. संघव्यवस्थापक म्हणून डॉ.अनिल झळके यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, सर्व संचालक मंडळ, चिटणीस तसेच प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व उपप्राचार्य, समन्वयक व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वीतांचे हार्दिक अभिनंदन केले.