गुरुजनांचा ग्रामस्थांनी केला सत्कार, कपाट मिळाले भेट…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक २७ फेब्रुवारी रोजी कलाविष्कार २०२३ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना उपस्थित ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर दाद दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिप सदस्य शांताराम पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील, उद्योजक परेश शिंदे, सरपंच आशाबाई भील, उपसरपंच भिकन भालेराव पाटील, डॉ. विलास पाटील, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, एल जे चौधरी, प्रदीप चौधरी, हरिभाऊ मारवडकर, यशवंत शिंदे, नरेंद्र पाटील, शामकांत पाटील, मारवड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते. कु. दिव्या पाटील व हरीश पाटील यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात येवून सन्मानचिन्ह देण्यात आले.
माहेश्वरी रवींद्र साळुंखे हिला व्ही स्कूल उत्कृष्ट वापराचे बक्षीस मिळाले. उपसरपंच भिकन पाटील यांनी शाळेतील मनीषा पाटील, स्वाती पाटील, दिनेश मोरे, सारिका काटके, शारदा जाधव, वैशाली पाटील, गणेश चव्हाण या शिक्षकांचा प्रतिमा आणि सन्मानपत्र देत गौरव केला. हर्षल पाटील यांनी सायन्स कॉलेज कडून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र दिले. यावेळी परेश शिंदे यांनी दोन्ही शाळांना पुस्तके ठेवण्यासाठी कपाट भेट दिले. शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येवून आभार मानण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अरुण साळुंखे, गोपाल बोरसे, हेमकांत साळुंखे, उमाकांत साळुंखे यासह ग्रामस्थ, शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभले. शिक्षक गणेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.