प.पू. संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते होणार संपन्न, २ व ३ मार्च रोजी आयोजन…
अमळनेर:- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे भव्य दिव्य श्री शनि महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, कळस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प.पू. संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
चिमणपुरी पिंपळे येथे दिनांक 02 व 03 मार्च रोजी भव्य दिव्य श्री शनी महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठान सोहळा आचार्य पद दीपेश गुरुजी व सहकारी नाशिक यांच्या हस्ते होणार आहे व शिखरकलशाचा कार्यक्रम परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 46 फूट उंच असलेले प्रशस्त सभा मंडप तसेच परिसरातील कंपाउंड व बाल उद्यान करण्याचे शनी मंदिर समितीने ठरविले आहे. गुरुवार दिनांक 02 रोजी सकाळी 7 वाजेला मुर्ती शोभा यात्रा व पूजेस प्रारंभ, तसेच विविध विधी संपन्न होणार आहेत. मंदिरासाठी मूर्ती विजय निंबा चौधरी (सहाय्यक, कामगार आयुक्त पालघर) यांनी यांनी आणून दिली आहे. तसेच मुख्य कार्यक्रम 03 मार्च रोजी सकाळी आठ वाजता होम हवन विधी होवून चमत्कारी श्री शनी मंदिरात श्री शनि महाराज विराजमान होतील. त्यानंतर सकाळी 11 वाजेपासून तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. संत ईश्वरदासजी महाराज अध्यक्ष श्रीराम मंदिर नंदगाव, बालकनाथजी महाराज, ॲड दिनेश जिजाबराव काटे, चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम संस्थान कोळपिंप्री यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चिमनपुरी पिंपळे येथील ग्रामस्थांनी केले आहे.