मारवड पोलिसांनी शिंदखेडा येथून घेतले ताब्यात…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे वाळू वादातून झालेल्या खूनप्रकरणी फरार मुख्य आरोपीस काल ताब्यात घेतले आहे.
मांडळ येथील वाळूच्या वादातून जयवंत यशवंत कोळी याचा खून झाल्याची फिर्याद पत्नीने दिली होती. त्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी वगळता इतर सर्वांना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी असलेला अशोक लखा कोळी हा दीड महिन्यापासून फरार होता. त्याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोहेका संजय पाटील, पोहेका सुनिल आगोणे, पोना सुनिल तेली, पोकॉ अनिल राठोड, पोकॉ उज्वल पाटील, पोकॉ तुषार वाघ, पोकॉ दिनेश पाटील यांचे पथक तयार करुन गुप्त माहीतीच्या आधारे आरोपी अशोक लखा कोळी यास शिंदखेडा जि. धुळे येथून काल ५ मार्च रोजी ताब्यात घेतले. त्यामुळे मारवड पोलिसांचे कौतुक केले जात असून सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक जयेश खलाणे जयेश डी. खलाणे हे करीत आहेत.