धारजवळ सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारकांचे हाल…
अमळनेर:- तालुक्यातील धार गावाजवळ फरशी पुलाचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी बनवलेला पर्यायी रस्ता प्रवाशांसाठी धोकेदायक ठरत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धार गावाच्या अलीकडे पाझर तलावाजवळ फारशी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्य रस्त्याच्या बाजूने मुरूम टाकून तात्पुरता रस्ता बनविण्यात आला आहे. मात्र हा पर्यायी रस्ता खोल असून जाड मुरुमाच्या खड्यांमुळे बऱ्याचदा दुचाकी अडकून पडत आहे. तसेच रात्री बेरात्री येणाऱ्या वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे. तसेच याठिकाणी दोन्ही बाजूने मोठी वाहने आल्यास वाहतूक अडकून पडत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाकडे लक्ष देवून पर्यायी रस्ता सोयीस्कर करावा अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.
प्रतिक्रिया
पर्यायी रस्त्याची योग्य व्यवस्था न झाल्याने वाहनधारकांची गैरसोय होत असून संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे व ही समस्या दूर करावी.
रमेश पाटील, प्रवासी