अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे गावठी दारू विकणाऱ्या एकाला मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळमसरे येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलीस ठाण्यातील पथकाने कळमसरे येथील तांदळी रस्त्यावर नाल्याकाठी छापा टाकला असता बारकु फुला भील हा १२०० रू. किमतीच्या गावठी दारुसह मिळून आला. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेवून पो.ना सुनील तेली यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. मुकेश साळुंखे करीत आहेत.