अमळनेर:- येथील न्यायालयात जागतीक महिला दिनानिमित्त विधी सेवा समीती तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी यांच्यामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला दिनानिमित्त अमळनेर न्यायालयातील न्यायदान कक्षात हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर शिबीरात जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.आर.चौधरी तसेच दिवाणी न्यायालय व स्तर पी.पी देशपांडे, दिवाणी न्यायालय क स्तर सौ. एस. एस. अग्रवाल, सौ. एस. एस. जोधळे व श्रीमती.ए.यु यादव असे सर्व न्यायमुर्ती व सरकारी अभीयोक्ता के. आर.बागुल हजर होते. यात मा. न्यायाधीश श्री.पी.पी देशपांडे यांनी महिलाचे समाजातील स्थान याबाबत थोडक्यात कथन केले. तसेच सौ. एस.एस अग्रवाल यांनी महिलांवर कविता रूपी विश्लेषन करून ‘मां मुझे भी उड़ना है’ या कवितेचे सादरीकरण केले. तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांचे काळातील महिलाचे स्थान व आजच्या काळातील महिलाचे स्थान याबाबतीत त्यांनी थोडक्यात माहिती दिली. कर्मचा-याच्या वतीने दिवाणी न्यायालय व स्तर येथील सौ. मराठे यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास अमळनेर न्यायालयातील सर्व महिला कर्मचारी व इतर कर्मचारी वृंद हजर होते. यावेळी कर्मचा-याच्या संघटनेकडुन सर्व महिला न्यायाधीश व कर्मचारी यांना भेटवस्तु देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले.