
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथून ८२ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची फिर्याद मारवड पोलीसात देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, झाडी येथील राजधर सोमा पाटील हे मानसिक आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर सुरत येथे चार वर्षापासून उपचार सुरू होते. दिनांक ८ रोजी सकाळी ७ वाजे नंतर झाडी येथील राहत्या घरून ते कोणालाही न सांगता निघून गेले. घरच्यांनी आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे नातू जयेश पाटील याने मारवड पोलीसात हरविल्याची तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास पो. सचीन निकम करीत आहेत.







