
पं. ज.नेहरू समाजकार्य महाविद्यालयात आयोजन…
अमळनेर:- दि. 10 मार्च रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्रायोजित आणि श्रम साफल्य एज्युकेशन संचलित पं ज.ने.समाजकार्य महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय “डिजिटल इंडियाचे फायदे” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी स्वागत गीत घेण्यात आले स्वागत गीतासाठी सोनल भाई, किरण पिंपळे हे विद्यार्थी होते. कार्यशाळेचे उद्घाटक डॉ संदीप नेरकर होते. सिनेट सदस्य कबचौउमवी अध्यक्ष श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे संचालक अभिजीत भांडारकर हे होते. प्रथम सत्र कार्यक्रमाचे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ जगदीश सोनवणे यांनी केले. उद्घाटक मा.डॉ. संदीप नेरकर यांनी उद्घाटन पर उद्बोधन केले. प्राचार्य डॉ पी एस पाटील यांनी डिजिटल इंडियाचे फायदे यावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे संचालक अभिजीत भंडारकर यांनी आपल्या भाषणात डिजिटल इंडियाचे होणारे फायदे आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा उपयोग या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणार आहे.उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अनिता खेडकर यांनी केले. डॉ. संदीप नेरकर यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल इंडिया व शैक्षणिक विकास याविषयी मार्गदर्शन केले. संदीप नेरकर सरांनी त्यांचा आजचा काळात भारतात होणारी डिजिटलायझेशन व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात होणारे बदल कशाप्रकारे होत आहेत डॉ. सागराज चव्हाण सरांनी सूत्रसंचालन केले. त्याबरोबर डॉ. संदीप नेरकर हे विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून त्यांची निवड झाली त्याबद्दल महाविद्यालयात त्यांच्या सत्कार करण्यात आला. डॉ. योगेश तोरवणे यांनी डिजिटल इंडिया व ग्रामीण विकास या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ योगेश तोरवणे सरांनी विद्यार्थ्यांना पझल सोल्व करण्यास सांगितले. गटचर्चा माध्यमातून डॉ. श्वेता वैद्य मॅडम यांनी तृतीय सत्राचे सूत्रसंचालन केले. डॉ. सी आर देवरे हे चौथ्या सत्राचे व्याख्याते होते. त्यांनी डिजिटल इंडिया चे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. पंधराशे गाव हे या जिल्ह्या तालुका ग्रामपंचायत एकमेकांना digitalisation एकमेकांना जोडणे शक्य झाले. विविध उदाहरणाच्या माध्यमातून माहिती दिली. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ अस्मिता सरवय्या यांनी केले. डॉ. जगदीश सोनवणे यांनी इंडिया व दळणवळण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध उदाहरणांचा माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून माहिती सांगितली. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. धनराज ढगे यांनी केले. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पी एस पाटील होते. या कार्यशाळचा एकूण 79 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी आधुनिक काळातील वाढत्या डिजिटल कार्यामुळे विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या भविष्यात उपयोग होईल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ. अनिता खेडकर व प्रा डॉ जगदीश सोनवणे यांनी नियोजन केले. पण प्रा.डा. श्वेता वैद्य प्रा.डा.अस्मिता सरवय्या प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा डॉ. भरत खंडागळे, प्रा.धनराज ढगे प्रा डॉ.सागराज चव्हाण प्रा. चंद्रशेखर बोरसे, सहाय्यक विद्यार्थी विकास कार्यालय अधीक्षक अनिल वाणी, ज्योती सोनार महेश शेलार ईश्वर ठाकरे देवेंद्र सरदार कोमल सूर्यवंशी विद्यार्थी प्रतिनिधी मजयेश भोई, दीपक विश्वेश्वर, गायत्री पाटील, सोनाली भोई, निखिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमाणपत्र वाटप करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा डॉ जगदीश सोनवणे व विसपुते सुषमा यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ अनिता खेडकर यांनी केले.







