
अमळनेर पोलिसांनी केली एका संशयिताला अटक…
अमळनेर:- शहरातील गांधलीपुरा भागात तिघांनी चाकूने हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली होती. त्याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
दिनांक १० मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास गांधलीपुरा चौकात तीन इसमानी एका इसमावर चाकू हल्ला केला याबाबत माहिती मिळाली. त्यावरून श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी होत असल्याने गस्तवर असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकासह तात्काळ सदरील ठिकाणी भेट दिली. जुबेर पठाण (रा. मिलचाळ) याच्यावर रफिक उर्फ काजल रशीद शेख व त्याच्या सोबत शाहरुख अली अख्तर अली पठाण व अरबाज उर्फ काल्या अली अत्तर अली यांनी जुबेर याच्यावर चाकू हल्ला केला. त्यावरून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पथके तयार करून पथक रवाना केली. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकातील पीएसआय अनिल भुसारे व विकास शिरोळे तसेच पोलीस अमलदार शरद पाटील, दिपक माळी, रवि पाटील यांनी रफिक उर्फ काजल रशीद शेख यास चतुराईने ताब्यात घेतले. चाकू हल्ल्यात जखमी जुबेर पठाण यांनी दिलेल्या जबाबावरून अमळनेर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३०७, ३९४ व ३९७ प्रमाणे दाखल असून तपास पीएसआय अनिल भुसारे यांच्याकडे तपास असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास २ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.







