द्रौ.रा.कन्याशाळेत लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम…
अमळनेर:- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रौ.रा.कन्याशाळेत महिला दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब अमळनेर तर्फे विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्त्रीरोगतज्ञ डॉ.सुप्रिया कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिराचे आयोजन रोटरी हॉल ला करण्यात आले होते. यावेळी लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे, ट्रेझरर अनिल रायसोनी, डॉ.मिलिंद नवसारीकर, शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी आरोग्यविषयक विविध समस्या तज्ञांसमोर मांडल्या.यावर सविस्तर मार्गदर्शन शिबिरात करण्यात आले.यावेळी ३०० पेक्षा जास्त विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पी.पी.जोशी यांनी केले.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.