कॉपर केबल व धातूच्या पट्ट्या केल्या लंपास…
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील बीएसएनएल कार्यालयात पुन्हा चोरीची घटना घडली असून मारवड पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
उपमंडळ अभियंता पंकज रायसिंघानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने दिनांक १९ रोजी अमळगाव येथील बीएसएनएल कार्यालयाच्या गच्चीवर चढून दरवाज्याला होल पडून आत प्रवेश केला. १० हजार किमतीची कॉपर केबल व १० हजार रुपये किमतीच्या बॅटरीला लावलेल्या धातूच्या पट्ट्या असा एकूण वीस हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात भादवि कलम ४६१, ३८० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. संजय पाटील हे करीत आहेत.