३६ हजार ५०० लुटले, एसपींची घटनास्थळी भेट…
अमळनेर:- तालुक्यातील धुळे रोडवरील जानवे गावाच्या पुढे असणाऱ्या पांडुरंग पेट्रोल पंपावर अज्ञात इसमाने बंदुकाचा धाक दाखवत लुटमार केल्याची घटना घडली असून अमळनेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी मध्यरात्री १२:१५ वाजेच्या सुमारास काळा रुमाल बांधून एक इसम आला. त्याने बंदूक काढून धाक दाखवत पेट्रोल पंपावरील कर्मचारी कडून तसेच पेट्रोल भरण्यास आलेल्या एकाकडून एकूण ३६ हजार ५०० रुपयांची लूट केली. त्यानतंर त्याच्या साथीदारासोबत तो दुचाकीवर धुळ्याकडे निघून गेला. सीसीटिव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाले असून लूटमार करणाऱ्याने काळा रुमाल परिधान केला आहे. याठिकाणी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पंपावरील कर्मचारी नरेंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.