इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू, नवख्यां उमेदवारांना चांगला प्रतिसाद…
अमळनेर:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांनी ग्रामीण भागात भेटी गाठी मोठ्या प्रमाणावर वाढवल्या आहेत.
सोमवार दिनांक २७ मार्च पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे सुरू होत असल्याने उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. ग्रामीण भागात मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यावर उमेदवारांचा भर असून यंदा मोठ्या प्रमाणात नवख्या उमेदवारांनी तयारी सुरू केली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील निवडणुकीत जुगार लागलेल्या काही संचालकांनी देखील तयारी सुरू केली असून तुलनेत मातब्बर नवख्या उमेदवारांमुळे त्यांची गोची होणार असल्याचे चित्र आहे. काहींसाठी यंदाची मार्केट निवडणूक ही जि.प.पं.स.साठीची पहिली पायरी असून एकंदरीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्ष कोणत्या उमेदवारांना संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून तीन चार दिवसात चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे.