प्रचारात ही महाविकास आघाडीच्या इच्छुकांचीच आघाडी…
अमळनेर:- कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात महाविकास आघाडी स्थापन करून आपआपल्या पक्षातील एकूण व्यूहरचना बाबत काल माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडी संदर्भात बंददार चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे उपस्थित होते.
आमदार अनिल भाईदास पाटील वैद्यकीय कारणासाठी मुंबईत असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून बैठकीला उपस्थिती दर्शवली. यावेळी महाविकास आघाडी संदर्भांत सर्वाधिकार माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांना देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी आपले नामांकन भरून ठेवावे, मात्र त्यावर छाननी नंतर वरिष्ठांच्या आदेशान्वये उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते. या बैठकीस तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोकुळ बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, डॉ.अनिल शिंदे, सुलोचना वाघ, भागवत पाटील, संजय पाटील, प्रा.सुरेश पाटील, विजय पाटील, संदीप घोरपडे, मनोज पाटील, विक्रांत पाटील, श्याम पाटील, श्रीकांत पाटील, बाम्हणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन गणेश भामरे, भूषण पाटील आदी उपस्थित होते.