
शिंदखेडा:- तालुक्यातील भडणे येथे काल दि. एक एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता गुजरात राज्यातील इस्कॉन मंदिराचे प्रभू स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत गावातुन शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजन भडणे येथील माजी सरपंच पांडुरंग पुना माळी यांनी केले. संपुर्ण गावात शोभायात्रा काढण्यात आली सायंकाळी पाच वाजता गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून भगवान राधा कृष्ण याची मिरवणूक काढण्यात आली. गावातील भजनी मंडळ माता-भगिनी, अबाल वृद्धमंडळींनी सहभाग नोंदवून मिरवणुकीत सहभाग घेऊन आनंद द्विगुणीत केला. यावेळी गावातील भजनी मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता प्रवचनाने करण्यात आली. यावेळी भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील, माजी सभापती विश्वनाथ पाटील, उपसरपंच भाऊसाहेब निकम, भडणे येथील पोलिस पाटील युवराज माळी, हिरालाल पाटील, पोपट माळी, दत्तू पाटील, एकनाथ लोहार, यशवंत पाटील, राजेंद्र अधिकार पाटील, नाना लोहार, सुभाष गिरासे व गावातील भाविक भक्तांनी कार्यक्रम सहकार्य केले.




