
अमळनेर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,चंद्रपुर द्वारा ता.मुल येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत अमळनेर शहरातील पैलाड भागातील के.डी. गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय मधील खेळाडू सैय्यद निजामअली हसनअली याने १९ वर्षाआतील ९२ किलो वजनगटात सहभाग घेऊन सिल्वर मेडल जिंकत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.

त्याने अमरावतीचा करण पवार, लातुर येथील सागर यादव व कोल्हापूर येथील ओम शेवाळे यांस चितपट केले तसेच संभाजीनगर येथील युवराज जाधव १०-०० ने पराभूत केले.
तरी या खेळाडूचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन अविनाश संदानशिव, मुख्याध्यापक आंनदराव नेतकर, पर्यवेक्षक डि.एस.पाटील यांनी कौतुक केले. या खेळाडूस शाळेचे मुख्याध्यापक आंनदराव नेतकर, क्रीडा शिक्षक निलेश विसपुते तसेच सैय्यद हसनअली यांचे मार्गदर्शन लाभले.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.







