
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथे घरासमोर लावलेली तीन इसमांनी दुचाकी जाळल्याने पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शीतल तानाजी वाघ यांची फॅशन प्रो मोटारसायकल क्र. एमएच १९ बीए ६८४१ घरासमोर ओट्यावर लावलेली होती. दिनांक १८ एप्रिल रोजी मध्यरात्री फत्तेलाल अर्जुन पाटील, किर्तिकुमार सयाजी पाटील, जितेंद्र अशोक पाटील यांनी ती जाळून टाकल्याचे फिर्यादीत नमूद केले असून याप्रकरणी भादवि कलम ४३६ सह अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(२)(v) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.







