नवीन निवडून आलेल्या विकासो सदस्यांचा केला सत्कार…
अमळनेर:- तालुक्यातील धार येथे सुरेश सजन पाटील यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.
सन 1994 पासून सुरेश सजन पाटील हे २७ व्या रोजाला इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. या उपक्रमाला २७ वर्ष पूर्ण झाल्याने संपूर्ण मुस्लिम समाजासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. मुस्लिम समाजातर्फे त्यांचे चिरंजीव वि.का. सोसायटीचे सदस्य मिलिंद सुरेश पाटील यांच्या जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच यशवंत शंकर पाटील, अरुण भाईदास पाटील, ग्रामस्थ तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन शेतकी संघाचे माजी प्रशासक सदस्य अलीम मुजावर यांनी केले व आभार विकास सोसायटीचे माजी चेअरमन व्ही एन मुजावर यांनी मानले.