चांगल्या हंगामासाठी व पावसासाठी केली प्रार्थना…
अमळनेर:- तालुक्यातील धार, कळमसरे, शिरसाळे, मांडळ, डांगरी, मारवड व अमळगाव या गावातील मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सन नमाज पठण करून तर हिंदू बांधवांना मुस्लिम बांधवांनी अक्षय तृतीयानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देऊन शांततेत व मोठ्या उत्साहात दोन्ही सण साजरा करण्यात आला . यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी शेतकऱ्यांना जिव्हाळ्याचा विषय असलेल्या चांगल्या हंगामासाठी व पावसाळ्यात चांगला पाऊस व्हावा म्हणून ही अल्लाह कडे नमाजपठण करून प्रार्थना केल्या.
धार येथील मज्जीद मधे झालेल्या नमाज पठण कार्यक्रमात अमळनेर सह परिसरातील गावातील मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून नमाज पठण करून हिंदु मुस्लिम बांधवांसह मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, माजी सरपंच यशवंत पाटील, अलीम मुजावर,विकास सोसायटीचे माजी चेअरमन व्ही एन मुजावर ,सरपंच दगडू सैदाने, प्रमोद पाटील ,नईम मुजावर, भानुदास पाटील, माजी उपसरपंच एम ए.पठाण, माजी सरपंच गणेश पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रफुल्ल पवार, पोलीस पाटील जिजाबराव पाटील आबा वाडीले, उपसरपंच शशिकांत पाटील , मुन्ना मिस्तरी ,रफार मुजावर भाऊसाहेब पाटील, महेंद्र बोरसे, सचिन पाटील,शांतता समितीचे सदस्य वसंतराव पाटील, डॉक्टर विलास पाटील , बाबूलाल पाटील, प्रा हिरालाल पाटील, प्रा गणेश पवार, गौरवकुमार पाटील व सामाजिक कार्यकर्तांकडून रमजान ईद व अक्षयतृतीयाच्या एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्यात. तर कळमसरे येथे छब्बीर खाटीक, लालबा मिस्तरी, बुर्हान भाई, मुस्ताक खाटीक, मिया भाई यांना , देखरेख संघाचे माजी चेअरमन पिंटु राजपुत, पत्रकार बांधव व माळी समाज मंडळासह, महाराना प्रताप राजपूत युवा मंचच्या सदस्यांकडून गुलाब पुष्य देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले तर प्रगणे डांगरी येथील शेकडो वर्ष जुन्या मज्जीदमधे युवक व वयोवृद्ध मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद निमित्त नमाज पठण करण्यात आले व माजी सरपंच अनिल शिसोदे व पोलीस पाटील आबा वाडीले पदाधिकाऱ्यांसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा दिल्या. तसेच अमळगाव, मांडळ,मारवड व शिरसाळेत ही रमजान ईद उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली. येणाऱ्या पावसाळ्यात पावसासाठी प्रार्थना करत शेतकरी वर्गाला भरघोस उत्पादन मिळण्यास प्रार्थना करण्यात आली. रमजान ईदच्या सनानिमीत्त वरिल गातात मारवड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांचेसह, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, हवालदार मुकेश साळुंखे, सचिन निकम, सुनील तेली, भास्कर पाटील, फीरोज बागवान, सुनील अगोने,अनिल राठोड ,तुषार वाघ,भरत इशी आदी पोलीस बांधव यांनी बंदोबस्तात पोलीस व होमगार्ड यांनी सहकार्य केले. पाच कर्मचाऱ्यांचा फिक्स पाॅईट व शांततेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे ईदचा सण मोठ्या उत्साहात व शांतपणे साजरा करण्यात आला त्यात हिंदू मुस्लिम समाजातील एकतेचा शुभेच्छा संदेश देणारे फलक व बॅनर बहुतांश गावात लावण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते ही उपस्थित राहून एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते,