मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन, वैयक्तिक पाकिट देण्यावर भर…
अमळनेर:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांना रात्रीतून मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन झाले. आज सकाळी मतदानास सुरुवात झाली असून किती प्रमाणात मतदान होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आधी पॅनलमधून लढणाऱ्या उमेदवारांनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार वैयक्तिक पाकिट वाटप करण्यावर भर दिला. काही अपक्षांनी ही मोठ्या प्रमाणावर वाटप केले आहे. सर्वसाधारणपणे १०००, १५००, २००० असे पाकिट वाटप करण्यात आले. एका अपक्षाने पाकिटासोबत विठ्ठल रुखमाईचे ही दर्शन मतदारांना घडविले. आपण नातेवाईक आहोत लक्ष ठेवा अशी आर्जवे फोनवरून व प्रत्यक्ष भेटून मतदारांना घालण्यात आली. मात्र आता कोणाची भवितव्य काय आहे हे ३० रोजीच समजणार आहे.
बाजार समितीच्या एकूण १६ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात असून सकाळी ८:०० ते दुपारी ४:०० पर्यंत मतदान होणार आहे. विकासोच्या सर्वसाधारण सात जागांसाठी २६, महिला राखीवच्या दोन जागांसाठी ६, ओबीसी मतदारसंघाच्या एक जागेसाठी चार, तर भटक्या विमुक्त राखीव एका जागेसाठी दोन उमेदवार मैदानात असून हमाल मापाडी मतदारसंघाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार उभे आहेत. ३० रोजी सकाळी १०:०० वाजेपासून सुरु मतमोजणी सुरू होणार आहे.