अमळनेर:- तालुक्यातील प्र. डांगरी येथील २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी मारवड पोलिसांत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २७ रोजी दुपारी १२:३० वाजता निखिल सुभाष पवार हा अमळनेर हून काम पाहून येतो असे सांगून घरून निघून गेला असून मात्र त्याच्याशी संपर्क न झाल्याने तसेच दोन दिवस झाले तरी घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास पो. ना. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.