अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथील एकास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी मारवड पोलीसात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकलहरे येथील तान्हाजी पंढरीनाथ वाघ हा अंगण झाडत असताना फत्तेलाल पाटील, किर्तिकुमार पाटील, जितेंद्र पाटील, उदय पाटील, तान्हाजी पाटील, विकास पाटील, शिवाजी पाटील, मुकेश पाटील, विशाल पाटील, साक्या पाटील, गोपी पाटील, मनोहर पाटील, सयाजी पाटील, यांनी येत फिर्यादी व त्याच्या पत्नीस शिवीगाळ करत मारहाण केली व चौकात ओढून नेले असे फिर्यादीत नमूद केले असून याप्रकरणी भादवि कलम ३५४, ४१३, ४१७, ४१९, ३२३, ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती जमाती कायदा कलम अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. कॉ. तुषार वाघ करीत आहेत.