अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे येथे ४६ वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली असून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गलवाडे येथील नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून दिनांक २९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावातील अशोक पाटील याने कळविले की, त्याचा लहान भाऊ सतीलाल हरचंद पाटील (वय ४७) याने विषारी औषध प्राशन केले असून त्यास अस्वस्थ वाटू लागले आहे असे सांगितल्याने गावातील मंडळी सोबत जात त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास खाजगी रुग्णालयात नेल्याचा सल्ला दिल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याठिकाणी उपचार सुरू असताना ३० रोजी सकाळी ६ वाजता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.