
मा.आ. स्मिता वाघ यांनी सोडविले भिलाली ग्रामस्थांचे उपोषण…
अमळनेर:- तालुक्यातील भिलाली येथील साठवण बंधाराची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर माजी आमदार स्मिता वाघ यांच्या मध्यस्तीने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

भिलाली गावातील साठवण बंधाराचे काम सुरु असून 1 कोटी 36 लाखाचा साठवण बंधारा हा फरशी पुलाला लागुन बांधला जात आहे. बंधारा बांधताना पाया हा जमिनीत खडक अगर कडक मुरुम वर पाया ओतला जायला पाहिजे होता.परंतु ठेकेदाराने सदर पाया हा वरचेवर वाळुवर ओतणे सुरू केले असून पावसाळ्यात पुराचा दाबामुळे पायाच्या खालुन पाणी जावुन बंधारा वाहु शकतो तसेच जास्त पाण्याचा दाब असल्याने फरशी सुध्दा वाहु शकते व शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान होऊ शकते. म्हणुन बांधकामाची चौकशी करून इस्टीमेट प्रमाणे बांधकाम करावे अशी मागणी भिलाली येथील ग्रामस्थांची आहे. सदर ठेकेदार यांना वारंवार सुचना देवुन सुध्दा नियमाप्रमाणे कामकाज करत नसल्याने भिलाली ग्रामपंचायत सदस्य यांनी संबधीत विभागाकडे तक्रार केली होती. तरी देखील संबधीत अधिकारी चौकशी करायला येत नव्हते.म्हणुन भिलाली येथील ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कन्हैयालाल पाटील, विजय शिवाजी पाटिल, रविंद्र साहेबराव पाटील, सतिष भगवान पाटिल यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उपोषणाची नोटीस दिली होती. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता ग्रामस्थ विश्वास पाटील, संजय पाटिल, दिपक पाटिल, नानाभाऊ पाटील, दिलभर पाटील, चंपालाल पाटिल, अमुत पाटील, निलेश पाटिल, चेतन पाटील, भावेश पाटील, रमाकांत पाटील, रावसाहेब पाटील, रामकुष्ण पाटील, कुणाल पाटील,भोला पाटील उपोषणाला बसलेले होते. मा.आमदार स्मिताताई वाघ यांनी संबधीत अधिकारी व ठेकेदार यांच्याशी चर्चा करून चौकशी करुन चांगले बांधकाम करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आलेले आहे.







