
मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे मानले सर्वांचे आभार…
अमळनेर:- येथील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मालपुर येथील प्रफुल्ल पवार यांना मतदारांनी पुन्हा भरघोस मतदान देत संचालक पदी विराजमान केले आहे.

तालुक्यातील मालपुरसारख्या छोट्या गावातून सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्रफुल्ल बापूंनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावर मजल मारली. परिसर व नंतर तालुक्यात सर्वत्र जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करत वेळोवेळी यशापयशाची चव चाखत सर्वसामान्यांशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळेच प्रफुल्ल पवार हे यंदाही भरघोस मतांनी निवडून आले आहेत. काही स्वकियांनीच यावेळी दगा फटका करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. तसेच वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याविषयी मतदारांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र या सर्वांना पुरून उरत प्रफुल्ल पवार निवडून येत चोख प्रत्युत्तर दिले आहे. मतदारांनी दिलेल्या भरघोस प्रतिसाद व प्रेमाबद्दल त्यांनी मतदार व जनतेचे आभार मानले आहेत.







