
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजन…
अमळनेर:- येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल[ सी. बी. एस. इ.] च्या वतीने इस्रोचे शास्त्रज्ञ सतीश सेतू माधव यांचे “अवकाश आणि मानवाचे भविष्य” या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. सतीश सेतूमाधव राव, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एल. ए. पाटील तसेच नोबेल फाउंडेशन चे संस्थापक जयदीप पाटील, प्रताप कॉलेज चे माजी प्राचार्य डॉ.एस. आर. चौधरी, विजय पवार, बजरंग अग्रवाल, डी. डी. पाटील शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे, उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे संचालक बजरंग अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन केले. शाळेतील विद्यार्थिनी कु.आरती पाटील हिने इस्रो विषयी थोडक्यात माहिती सांगितली. जयदीप पाटील म्हणाले की, इस्रो ही संस्था कौतुक करण्यासारखी आहे. इस्रो संस्थेने अनेक कौतुकास्पद कार्य केले आहे तसेच इस्रो विषयीचे महत्त्व पटवून दिले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. सतीश सेतू माधव यांनी आपल्या जाहीर व्याख्यानातून इस्रोविषयीचे मनोगत व्यक्त करत अमूल्य अशी माहिती दिली. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला अधिक मजबूत बनवण्याकरिता आणि अंतराळ संशोधनाच्या विकासामध्ये इस्रोचे योग मोठे योगदान आहे तसेच भारत, अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान, चीन यासह भारत जगातील सहा देशांपैकी एक देश आहे. ज्यात जमिनीवर उपग्रह तयार आणि लॉन्च करण्याची क्षमता आहे. त्यांचे इस्रो मधील योगदान काय होते हे देखील उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांद्वारे अगदी मार्मिक शब्दात देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एल. ए. पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,शास्त्रज्ञ हा फक्त बुद्धिमान नसावा तर शहाणा असावा तसेच विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव आणू नका, त्यांच्यात आवड निर्माण होईल, त्यांना विचार करण्यास भाग पाडेल अशा पद्धतीने त्यांना शिकवा. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शिक्षिका जागृती पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी कु अर्णव पाटील व कु. भक्ती मकवान यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.




