शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या, शोध व निराकरण यावर सादर केलेल्या प्रयोगाची देश पातळीवर निवड…
अमळनेर:- डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक प्रतिभा शोध परीक्षा स्पर्धेत वेगवेगळया गटातील देशभरातून जवळपास ४७ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात तीन फेऱ्या घेण्यात आल्यावर बाल वयातील शैक्षणिक गुणवत्ता जतन करत इयत्ता ९ वीची बालवैज्ञानिक विद्यार्थिनी कु श्रीया नितीन मुंदडा हिला कांस्य पदकासाठी निवड समितीने घोषित करत भारताचे प्रसिद्ध परमाणु वैज्ञानिक डॉक्टर ए. पी. जयरामन यांच्या हस्ते नुकतेच कास्यपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
शेतकरी कुटुंबातील श्रीयाने शेतकऱ्यांना उध्दभवनाऱ्या समस्या व उपाय म्हणून सादर केलेल्या प्रयोगाला देश पातळीवर गौरविण्यात आले असून त्यासाठी कांस्य पदक प्राप्त झाल्याने मारवड सह पाडळसरे परिसरातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे , यापुढेही आपण शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सेंद्रिय शेतीत कमी खर्चात अधिक दर्जेदार उत्पादन व बाजारपेठेत थेट विक्रीवर शोधकार्य सुरूच ठेवणार असून त्याद्वारे माझ्या आजोळी असलेले अनुभवी प्रगतिशील शेतकरी अशोक मुंदडा यांचे मार्गदर्शन घेऊन कार्य करीत राहील असा संकल्प घेतला. इयत्ता ९ वीतुन कांस्य पदक प्राप्त केले. तिला हे पारितोषिक भारताचे प्रसिद्ध परमाणु वैज्ञानिक डॉक्टर ए. पी. जयरामन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एकुण ३ फेरीतल्या या स्पर्धेत सम्पूर्ण देशातुन किमान ४७ हजार विद्यार्थांनी भाग घेतला होता. त्यांना पहिल्या फेरित लिखित चाचणी, दुसऱ्या फेरित प्रात्यक्षिक आणि तिसरया फेरित एक परियोजनेची निवड करुन एक ॲप बनवायचे होते.
कु. श्रीयाने तिच्या आजोबांकडुन प्रेरणा घेऊन ग्रामीण विभागातिल शेतकऱ्यांच्या समोर निर्माण होणारे प्रश्न आणि समस्या यासाठी अँप बनवून त्यासाठी तिने गूगल फ़ॉर्म द्वारा एक प्रश्नावली बनविली. मारवड विकास मंच मधल्या अनेक शेतकरी बांधवांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन तिला त्यांच्या पिकांवर होणारे रोग, किड प्रादुर्भाव किंवा पोषक तत्वांच्या द्वारे कमीने होणारे दुष्परिणाम यासंबंधी माहिति गोळा करुन त्यावर उपाय सुचविणे अशा प्रकारच्या ॲपचा एक मुळ नमुना बनवला. या कार्यात तिला गुजरात मधील शेतकऱ्यांचे विशेष अभ्यासक यतिश पाटिल (मुळ रा. मारवड) यांचे विशेष सहाय्य लाभले. कु. श्रीयाच्या या यशात तिची आई राजश्री आणि वडिल नितिन मुंदडा यांचा अनमोल सहभाग आहे. कल्याण येथिल बिरला स्कूलच्या प्राचार्य आणि शिक्षकवर्गाचे ही अतिशय अनमोल असे मार्गदर्शन तीला लाभले. मोठपणी एक खगोलभौतिकी वैज्ञानिक बनुन देशसेवा करण्याचा तिचा मानस आहे. मारवड, ता. अमळनेर येथिल शेती अभ्यासक व प्रगतिशील शेतकरी अशोक मुंदडा यांची नात कु. श्रीया हिने अतिशय प्रतिष्ठित अशा “डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक प्रतिभा शोध परीक्षा” शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी म्हणून सहभाग घेतला होता हे विशेष.